Red PURPLE BLACK

Articles

स्वर्णीम संस्कृती राष्ट्रीय अभियान

आध्यात्मिकता द्वारा कला आणि कलाकरांचे दिव्यीकरण
ब्रह्माकुमारीज् तर्फे स्वर्णीम संस्कृती राष्ट्रीय अभियान
जळगाव ते अकोला दि. 19 ते 25 नोव्हेंबर, 2015
19 रोजी बालगंधर्व नाट्यगृहात होणार उदघाटन
 
ब्रह्माकुमारीज्च्या कला आणि सांस्कृतीक प्रभागातर्फे दि. 19 ते 25 नोव्हेंबर दरम्यान जळगाव ते अकोला : स्वर्णीम संस्कृती अभियानाचे आयोजन केलेले आहे. जळगावी 19 नोंव्हेबर अभियानाचे उदघाटन बालगंधर्व खुले नाट्यगृहात होईल.
 
आज सर्वत्र मूल्यांचा -हास होतांना दिसत आहे. कला क्षेत्रही त्यास अपवाद राहिलेले नाही. कला  ही  व्यक्ती  व समाजाच्या अंतरंगाचे  व संस्कृतीचे दर्शन घडवित असते. त्याचबरोबर. कला  क्षेत्राचा प्रभाव हा व्यक्तीच्या मानसपटलावर प्रतिबिंबित होत असतो.  तोच प्रभाव व्यक्ती व समाजाच्या विचार प्रवाहाची दिशा ठरवित असतो. आज मनुष्याच्या जीवनामध्ये व सामाजिक मूल्यांमध्ये झालेले अध:पतन हे कला क्षेत्रातील झालेल्या अध:पतनाचे प्रतिबिंब आहे.  या उद्देशाने प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या कला आणि सांस्कृती प्रभागातर्फे दि. 19 ते 25 नोव्हेंबर 2015 दरम्यान जळगाव ते अकोला स्वर्णीम संस्कृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.  
 
अभियानाचे उदघाटन दि. 19 नोंव्हेबर, 2015 रोजी जळगाव येथील बाल गंधर्व खुले नाट्यगृह येथे संध्याकाळी 6 वाजता आयोजित केलेला असून संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान स्थानिक कलाकारांच्या कलेचे सादरीकरण होणार आहे. उदघाटन मा. खा. रक्षाताई खडसे, मा. आ. राजूमामा भोळे, मा. श्री. गुलाबराव खरात, अप्पर जिल्हाधिकारी, मा. सौ. राखीताई सोनवणे, महापौर, मा. श्री. अशोकभाऊ जैन, उपाध्यक्ष, जैन उद्योग समूह, मा. श्री. शंभू पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी, ब्र.कु. कुसूम बहन, राष्ट्रीय समन्वयक, ब्र.कु. दयालभाई, ब्र.कु. सतिषभाई, माऊंट आबू, ब्र.कु. नितीनभाई, ब्र.कु. निहा बहन, मोनिका पटेल, मुंबई, डॉ. दामिनी मेहता, अहमदाबाद यांच्या शुभहस्ते होणार आहे. 
 
अभियानाचा मार्ग पुढील प्रमाणे असेल - जळगाव - 19 नोव्हेंबर, 20 नोव्हेंबर - नशिराबाद, भुसावळ, 21 नोंव्हेंबर - बोदवड, 22 नोव्हंेबर - मलकापूर, 23 नोव्हेबर खामगांव 24 नोंहेबर - शेगाव, 25 नोंव्हेंबर - अकोला येथे समारोप समारंभ. तरी सर्व नागरीकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन ब्र.कु मिनाक्षीदीदी यांनी केले आहे.