Bkvarta

प्रथम दिवस 18 डिसेंबर- राजयोग शिबिर प्रवचनमाला

आत्म्याच्या शक्तिस जागरूक करुन तनाव-मुक्त जीवन मुक्त जीवन जगा

 

श्रीरामपूर (दि.     ) येथील थत्ते ग्राऊंड वर आयोजित राजयोग शिबिराच्या पहिल्या दिवशी राजयोगीनी ब्राहृाकुमारी उषा दिदी यांनी आत्म्याच्या ख­या स्वरूपावर प्रकाश टाकला त्या म्हणाल्या की, विविध परिस्थितीनुसार आत्मा शब्दाचा अर्थ कधी-कधी मन असाही लावला जातो. राजयोगात आत्मा अर्थात मन, बुद्धी आणि संस्कारांनी बनलेली चैतन्य शक्ति असा आहे. मुळात योगाभ्यासाचा केंद्रबिंदू आत्मा असल्याने योगाद्वारे मन संयमीत बनते, ते आत्म्याच्या नियंत्रणात राहून संस्कारक्षम बनते. योगपद्धतीचा हेतु हा मन संयमित करणे आणि इंद्रिय विषयावरील आसक्तिपासून मन काढून घेणे हा आहे.  आत्मसाक्षात्कारासाठी इंद्रीयांना आवेग घालणे अत्यंत आवश्यक आहे. आवेग म्हणजे वाणी वेग, क्रोध वेग, मनोवेग, उदरावेग होय.

आत्म्यासंबंधीचे ज्ञान जगविण्याचा अत्यंत सोपा मार्ग म्हणजे अर्जुनाने भगवद गीतेत सांगीतलेल्या उपदेशांचा इतर सिद्धांतामुळे विचलित न होता केलेला स्विकार होय.

 गीतेचे ज्ञान आत्मसात केल्यामुळे मनासोबत शरीरातही परिवर्तन होते. आपणाकडे प्रचंड उर्जा आहे ती सकारात्मक दिशने खर्च करण्याचे शिक्षण गीतेमध्ये मिळते. कोणत्याही व्यक्तिचे आचार विचार चांगले असेल तर ती व्यक्ति जीवनात यशस्वी होते. जगात प्रेमाने काहीही जिंकता येते.

योग म्हणजे सबंध जोडणे, भौतिक् योग, व्यक्तियोग, आत्मा चा परमात्माशी योग, वेळेशी योग, दैवी आणि अलौकिक योग हे योगाचे चार प्रकारही त्यांनी सांगीतले. शरीर जीवन जगण्यासाठी पाँच तत्वों ची आवश्यकता असते. आत्माच्या सात गुणांच्याही त्यांनी या प्रसंगी उल्लेख केला. ज्ञान पवित्रता, प्रेम, शांती, सुख, आनंद, शक्ति हे ते सात गुण आहेत. या सात गुणांच्या शरीरावरील चयपचय क्रिया, ह्मदयाभिसरण, आदिंशी थेट परिवर्तन करते. आत्मा मन, बुद्धी तथा संस्काराने बनलेली दिव्य शक्ति आहे. या प्रसंगी पांच प्रकार के संस्कार ही त्यांनी स्पष्ट केले. पूर्व जन्माचे संस्कार, अनादी संकार, खानदानी संस्कार, दृढताचे संस्कार, वातावरणाचा प्रभाव आदि. व्यक्तित्व चे परिवर्तन. आत्म्याचा संपूर्ण आणि यर्थाथ परिचय ही दिला.

 

आत्म्यासंबधीचे ज्ञान जागविण्याचा अत्यंत सोपा मार्ग म्हणजे अर्जुनाने भक्त गीतेत सांगितलेल्या उपदेशांचा इतर सिद्धांतामुळे विचलीत न होता केलेला स्विकार होय.

 

ईच्छा आणि मोहाच्या जाळ्यामध्ये फसलेल्या व्यक्तिची मनोदशा आज कुरूक्षेत्रामधील अर्जुनाप्रमाणे झाली आहे.  लोकांची एैकण्याची शक्ति लोप पावली आहे. प्रत्येक परिस्थितीत त्यांना निकाल तातडीने हवे असतात व त्यांच्या मागे लागून ते निकाल पदरात पाडून घेण्याची धडपड करतात त्यामुळे यांचा संयम ढासळत चालेला आहे. त्यायोगे माणूस हिंसक बनत चाललेला आहे.  परमात्म्याने गीतेतील ज्ञानात अहिंसक युद्धची शिकवण दिली असून गीतेत उल्लेखित मानवी देहाची हिंसा हे मनोविकारांविरूद्ध पुकारलेले युद्धाचे प्रतिक आहे.  आसूरी वृ्ती आणि दैवी वृत्ती यांच्यातील युद्ध आहे.

admin

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *