Bkvarta

द्वितीय दिवस 19 डिसेंबर- राजयोग शिबिर प्रवचनमाला

द्वितीय दिवस 19 डिसेंबर- राजयोग शिबिर प्रवचनमाला

परमात्मा सर्वज्ञ, सर्वशक्तिवान असून तो निराकार आहे.

 

श्रीरामपूर (दि.     ) परमात्मा हा गुणांचा सागर, सर्वशक्तिमान असून तो निराकार असल्याचे प्रतिपादन येथील थत्ते ग्राऊंड वर आयोजित राजयोग शिबिराच्या दुस­या दिवशी राजयोगीनी ब्राहृाकुमारी उषा दिदी यांनी परमात्म्याच्या ख­या स्वरूपावर प्रकाश टाकला.  आज परमात्म्याच्या भेटीसाठी व्यक्ति सर्वत्र यज्ञ, होम, हवन, जप, तप, तिर्थयात्रा, प्रार्थना, ध्यान, धारणा आदि मार्गाचा अवलंब करीत आहे, तसेच परमात्म्याच्या स्वरूपाविषयही ही प्रत्येक धर्मात, चालीरितीत जितक्या व्यक्ति तितक्या वेगवेगळया मान्यता आहेत, मात्र ख­या परमसत्य परमात्म्याविषयी परिचय नसल्यामुळे परमात्म्याकडून होणारी प्राप्ती त्यास होत नाही त्यामुळे लोकांचा परमे·ारावरील वि·ाास उडत चालेला आहे.

 

त्या पुढे म्हणाल्या की, परमात्म्यास जाणून घेतांना त्याचे काही निकष आहे, तो सर्वमान्य असावा, तो सर्वोच्च शक्तिवान असावा, सर्वज्ञ, सर्वोपरि आणि सर्व गुणों में अनन्त असावा. परमात्मा आणि प्रकृती या विषयी त्या म्हणाल्यात की, बहुतांश लोक आत्माच परमात्मा आहे असे म्हणतात, मात्र परमात्मा हा एकच आहे. कोणताही आत्मा आपल्या गुणांनी व कर्तव्यानी पुण्यात्मा, महात्मा, धर्मात्मा, देवात्मा बनु शकतो मात्र तो परमात्मा बनू शकत नाही. मनुष्यात्मा जन्ममरणाच्या चक्रात येवू शकतो परंतू परमात्मा जन्म मरणापासून अलिप्त आहे. त्याच प्रमाणे काही लोक त्यास सर्वव्यापी मानतात, ही भावना श्रेष्ठ आहे की परमात्मा मला पहात आहे म्हणून माझ्याकडून कोणतेही पाप होऊ नये मात्र हे सत्य नाही की तो कणा-कणात आहे.  असे असते तर कणा-कणात परमात्म्याची गुण उतरल्याने हा कलियुग कधीच सत्ययुग बनला असता. परमात्मा हा एकच असून तो परमधाम निवासी आहे. परमात्मा निराकार असल्याचा दाखला विविध धर्मात ज्योती, नूर, काबा, आदि संज्ञांनी सत्य ठरते. परमात्मा सत्य, शिव आणि सुंदर आहे. प्रत्येक धर्मात त्याची नावे मात्र वेगवेगळी असतील कुणी त्यास शिव, जेहोवाह, अल्लाह, गॉड, प्रकाश, आदि निराकार नावांनी संबोधतात.

admin

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *