Bkvarta

चतुर्थ दिवस 21 डिसेंबर- राजयोग शिबिर प्रवचनमाला

चतुर्थ दिवस 21 डिसेंबर- राजयोग शिबिर प्रवचनमाला

 

सृष्टि परिवर्तनाच्या उंबरठ¬ावर असतांना उठा, जागे व्हा आणि स्वत:स परिवर्तन करा

 

श्रीरामपूर (दि.     ) सांप्रत सृष्टि ही परितर्वनाच्या उंबरठ¬ावर असून लवकरच या सृष्टिचे परिवर्तन होऊन एक नवीन सत्वप्रधान जगाची निर्मिती होईल, तेव्हा अशा स्वर्णीम युगात जाण्यासाठी स्वत:स श्रेष्ठ बनवा असे  प्रतिपादन येथील थत्ते ग्राऊंड वर आयोजित राजयोग शिबिराच्या चौथ्या दिवशी राजयोगीनी ब्राहृाकुमारी उषा दिदी यांनी परमात्म्याच्या ख­या स्वरूपावर प्रकाश टाकला.

 

जगात वेळ ही अतिशय अमुल्य आहे, त्याचा पुढे कोणाचेच चालत नाही, ही परिवर्तनाची वेळ असून जर आम्ही आमच्यात परिवर्तन नाही केले तर वेळच आपल्या परिवर्तन करण्यास भाग पाडेल.  या वि·ाातील प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील आहे, परिवर्तन प्रकृतीचा नियम आहे. प्रत्येक चक्राच्या चार अवस्था असतात, दिवस रात्रीचे चक्र, सकाळ,दुपारी,संध्याकाळ, रात्री चे समयचक्र, उन्हाळा, हिवाळी,पावसाळा हे ऋतू चक, बालपण, युवाकाळ, गृहस्थ आणि वृद्धकाळ हे आयुष्याचे चक्र त्याच प्रमाणे सृष्टिचक्रातील सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग हे कालचक्र होय.

सृष्टिचक्र हे पाच हजार वर्षाचे असून त्याचे वैशिष्ट¬े म्हणजे ते प्रत्येक पाच हजार वर्षानंतर जसेच्या तसे परिवर्तन होते.  या प्रसंगी त्यांनी स्वस्तिकाचे आध्यात्मिक रहस्य स्पष्ट केले.

 

सृष्टिचे परिवर्तन कसे टप्प्या टप्याने होईल याचेही स्पष्टीकरण त्यांनी केले. त्यात अनेक महात्म्यांनी आपल्या कार्याने कसे प्रभावित केले त्याचीही त्यांनी माहिती दिली. सांप्रत काळ हा कलियुग असून कलियुगात विकृतींनी कसे थैमान घातले आहे, अनैतिकता, पापाचार, भ्रष्टाचार कसा बोळकावला आहे त्याचेही स्पष्टीकरण त्यांनी या प्रसंगी केले. अशा ह्रा कलियुगाचा अंतीमकाळ जवळ आलेला असून परिवर्तनाची वेळ समिप येऊन ठेवली आहे. कलियुगाच्या विनाशास कारणीभूत ठरणारी रासायनिक साधने, गृहयुद्ध प्राकृतिक विपत्तींचेही त्यांनी वर्णन केले.

 

या सृष्टीपरिवर्तनाचा मुख्य आधारस्तंभ म्हणजे संगमयुग होय जो कलियुग आणि सत्ययुग यांना जोडणारा आदिकाळ आहे, त्यालाच पुरषोत्तम युग असेही म्हणतात तेव्हा या युगात आत्मशुद्धीकरण करा, योगी बना, पवित्र बना असा संदेश परमात्मा देतात.

admin

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *