Bkvarta

पाचवा दिवस 22 डिसेंबर – राजयोग शिबिर प्रवचनमाला

पाचवा दिवस 22 डिसेंबर – राजयोग शिबिर प्रवचनमाला

 

कर्माची गुह्र गती

 

श्रीरामपूर (दि.     ) कर्माची गुह्र गती जाणून घेतल्यास आपणास हिरेतुल्य जीवन जगता येईल  असे  प्रतिपादन येथील थत्ते ग्राऊंड वर आयोजित राजयोग शिबिराच्या पाचव्या दिवशी राजयोगीनी ब्राहृाकुमारी उषा दिदी यांनी परमात्म्याच्या ख­या स्वरूपावर प्रकाश टाकला.

 

जसे कर्म कराल त्याचे फळ अवश्य मिळते, त्या प्रमाणे जसे बीज तसेच फळ असते या सिद्धांताप्रमाणे मानवी व्यक्ति ज्या योनीत शरीर सोडते पुन्हा मानवाच्याच योनीत प्रवेश करते हे स्पष्ट करतंाना त्यांनी विविध दृष्टांत दिलेत. मनुष्य योनीतील विविध टप्पे त्यांनी या प्रसंगी सांगितले. प्रत्येक योनीची आत्मा त्या योनीत खुश असते. यास बळ देतांना त्यांनी सांगितले की, आजपर्यंत ज्यांनाही पूर्नजन्म आठवला तो केवळ मनुष्याचाच आठवला कुठल्याही प्राणीमात्रांच्या नव्हे. या संदर्भात पूर्नजन्माविषयी विविध वैज्ञानिक संशोधनांचाही त्यांनी दाखला दिला.  जैसा कर्म वैसा जन्म उक्तीप्रमाणे कर्माची गुह्रगती विषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. विविध युगात मानवाच्या विविध अवस्थाही त्यांनी विषद केल्यात. त्याच बरोबर अकर्म, पुण्यकर्म, पापकर्म, श्रेष्ठ कर्म अशा कर्माच्या चार अवस्थाही त्यांनी स्पष्ट केल्यात.

 

admin

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *