Bkvarta

प्रथम दिवस 18 डिसेंबर – गीता ज्ञान रहस्य प्रवचनमाला

प्रथम दिवस 18 डिसेंबर – गीता ज्ञान रहस्य प्रवचनमाला

गीतेचा भावार्थ प्रेरणादायी असून ते मानवतेचे शास्त्र आहे :

ब्राहृाकुमारी उषा बहनजी

 

श्रीरामपूर (दि.     )  महाभारत काळात एकच अर्जुन होता ज्यास युद्धभूमीवर खचल्यानंतर  श्रीकृष्णांनी भगवदगीता सांगितली.  मात्र आजच्या काळात सर्वच जण अर्जुन झाले आहेत. संघर्ष , ताण-तणावाच्या आजच्या युगात भगवतगीतेचा भावार्थ सर्वांना प्रेरणादायी ठरणारा आहे, असे प्रतिपादन प्रजापिता ब्राहृाकुमारी ई·ारीय वि·ा विद्यालयातर्फे आयोजित गीता ज्ञान रहस्य कार्यक्रमात राजयोगीनी ब्राहृाकुमारी उषा बहनजी यांनी केले

 

येथील थत्ते ग्राऊंड वर गीता ज्ञान रहस्य व्याख्यानमालेस आजपासून प्रारंभ झाला.  त्या म्हणाल्या की, आज सर्वत्र मानसिक तणावाखाली मनुष्य जगत आहेत. वल्र्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या प्रसिद्ध केलेल्या अहवाला नुसार सन 2013 मध्ये प्रत्येक घरात किमान एक व्यक्ति डिप्रेशनने ग्रस्त असेल. अशा काळात अध्यात्म आणि ध्यानधारणाच मानवाला या रोगापासून वाचवू शकेल.

 

गीता हे मानवतेचे शास्त्र आहे. ते सर्व मानव मात्रांसाठी कल्याणकारी आहे. आध्यात्मिक विवेक ही भारतातील सर्वात मोठी संपत्ती आहे.  मात्र आपण पाश्चिमात्य देशांनी टाकून दिलेली चंगळवादी संस्कृति आपण आत्मसात करीत आहोत. उलट त्या लोकांनी आध्यात्माच्या स्विकार केलेला आहे.

 

ब्राहृाकुमारी उषा बहनजी यांनी आपले जीवन गीता ज्ञान प्रसारासाठी समर्पित केलेले असून या द्वारे देश विदेशात श्रीमदभगवत गीतेचे सत्य स्वरूप आणि रहस्य सांगून मानवमात्रास त्या दिपस्तंभ बनून मार्गदर्शन करीत आहेत. विशेषत: अॅनिमेटेड स्लाइर्डशोच्या माध्यमातून नवमाध्यम तंत्रज्ञानाचा वापरही त्या कुशलतेने करतात. याबरोबरच विविध उद्योग, बँका, विद्यापीठे, महाविद्यालये, सामाजिक संस्था या ठिकाणी त्या व्यवस्थान नेतृत्व कौशल्य, सकारात्मक जीवनशैली आदि बद्दल सखोल मार्गदर्शन करून सक्षम पीढी घडवित आहेत.

 

भारत आध्यात्मिक महासत्ता :

 

भारतामध्ये आध्यात्मिकतेचा समृद्ध वारसा असून आध्यात्मिक महासत्ता म्हणूनच वि·ा भारताकडे पाहत आहे. अशावेळी आपण पाश्चत्य संस्कृतीचे अंधानुकरण करून आपली प्राचिन संस्कृती विसरून चालणार नाही.

 

गीतेची वर्तमान काळाशी प्रासंगीकता :

 

गीता ही केवळ घडून गेलेली कथा नसून वर्तमान काळाशी तीची नाळ जुळलेली आहे, आजच्या काळ गीतेतील बहुतेक प्रसंग समाजात घटत असल्याने एक सखोल मार्गदर्शनासाठी आपण गीतेचा अभ्यास करावयास हवा. आजचे जीवन संघर्षमय आहे. अनेकवेळा जीवनाच्या वळणावर आपण दबावाखाली येतो अशावेळी गीतेच्या ज्ञानामुळे नवचेतना जागृत होते. विजयी होण्यासाठी आत्मवि·ाास जागृत होतो.

 

जीवन जगण्याचे सूत्र गीतेत :

 

गीता केवळ शास्त्र नसून एक समाजविज्ञानाचा मौलिक मार्गदर्शन ग्रंथही आहे. गीतेत मानवाला जीवन जगण्याचे यथार्थ सूत्र कळते. जीवन एक युद्ध आहे. सध्याच्या मानवाची मनोदशा अर्जुनासारखी झाली आहे. निराशावादी मानवाला ख­या अर्थाने गीतेतील ज्ञानाची गरज आहे. यथार्थवादी कर्मयोगी बनण्याची प्रेरणा गीता देते.  त्यामुळे गीता सध्याच्या युगातही मानवाला गरजेची आहे.

 

गीता एक समुपदेशकाची भूमिका :

 

सध्या सर्वांचेच जीवन गतिमान आणि स्पर्धामय झाले आहे. प्रत्येकालाच जीवनाची लढाई  लढावी लागते.  सगळ्यांनाच ही लढाई कुशलतेने लढता येतेचे असे नाही त्यात काही जण आपला आत्मवि·ाास गमावून बसतात, अनेकांना नैराश्यतेने गाठले जाते. नैराश्य आलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशावेळी नवचैतन्य मिळवायचे असेल, जीवनातील प्रत्येक प्रसंगात गीता एक कुशल समुपदेशकाची भूमिका बजावते. आपणास नैराश्येतेच्या गर्तेतून बाहेर काढून नवसंजीवनी देते.

 

शहरात प्रथमच आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या राजयोग शिक्षिका ब्राहृाकुमारी उषा बहनजी येत असल्याने शहरवासियांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. ठिकठिकाणी विद्यालयांच्या कार्यकत्यांनी लावलेले  उद्बोधक होर्डिग्ज्, बॅनर, पोस्टर लक्षवेधून घेत होते.  शहरात राजयोगीनी ब्राहृाकुमारी उषादीदी यांचे गीता ज्ञान रहस्य, साप्ताहिक प्रवचनमाला व सहज राजयोग शिबिर अशा दोन कार्यक्रमांस आजपासून प्रारंभ झालेला असून सहज राजयोग शिबिर हे दि. 18 ते 22 डिसेंबर, 2012 दरम्यान सकाळ सत्र आणि सायंकालिन सत्रात होणार आहेत. सकाळ सत्राची वेळ 6.30 ते 8.30 तर सायंकालीन सत्राची वेळ 6.00 ते 8.30 ही आहे. सदरहू कार्यक्रम परमात्म शक्तिद्वारे स्वर्णीमयुगाची पुन:स्र्थापना अंतर्गत संपूर्ण भारतात आयोजित केला जात आहे.

admin

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *