Bkvarta

दुसरा दिवस 19 डिसेंबर – गीता ज्ञान रहस्य प्रवचनमाला

दुसरा दिवस 19 डिसेंबर – गीता ज्ञान रहस्य प्रवचनमाला

अध्याय 2 व 3

 

सकारात्मक मार्ग अनुसरण्यास गीतेच्या समग्र विचारांची गरज

 

श्रीरामपूर (दि.      ) समाज अनेक विकृती व विकारांनी ग्रासलेला आहे. त्यामुळे जीवनात सकारात्मक मार्ग अनुसरण्यास गीतेच्या समग्र विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन येथील थत्ते ग्राऊंड वर आयोजित केलेल्या गीताज्ञान रहस्य प्रवचनमालेच्या दुस­या दिवशी राजयोगीनी ब्राहृाकुमारी उषाबहनजी यांनी केले.

 

गीता ज्ञान रहस्य प्रवचनमालेच्या आज दुस­या दिवशी श्रीरामपूर नगरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. आध्यात्मिक प्रेमींनी थत्ते मैदान फुलून गेले होत विद्यालयामार्फत पाच दिवसीय गीता रहस्य प्रवचनमाला आणि सहज राजयोग शिबिरासाठी परिसरातूनच नव्हे तर जिल्ह्ाभरातून नागरिकांची उपस्थिती लक्षवेधी ठरत आहे. दिवसेंदिवस या व्याख्यानमालेस श्रोत्यांची रूची वाढत असून थत्ते मैदान कमी पडेल असा आयोजकांचा अंदाज आहे.

 

त्या पुढे म्हणाल्या की, जीवनात सप्तगुण प्राप्तीसाठी गीतेत मार्ग सांगितलेले आहेत. सप्तगुण सप्तगुण मन, बुद्धी व संस्कारातून प्राप्त होतात.  मानवाच्या मनात नकारात्मक, सकारात्मक, कर्म व व्यर्थ विचार येतात. परंतु सध्याच्या तणावयुक्त युगात नकारात्मक विचार जास्त झालेले आहेत. विचार परिवर्तनासाठी धेैर्यता अंगी बाळगली पाहिजे. मानवाने सकारात्मक सदगुणांचा स्वीकार करणे आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्यात.

 

जोपर्यंत घराघरात महाभारत तोपर्यंत गीता संदेशाची गरज :

 

महान बुद्धिमान व्यासमुनीनंी महाभारत रचतांना विशाल कार्य केले. महाभारत माणासाची मनस्थिती आणि परिवार, समाज, देशाची कथा आहे. घराघरात महाभारत होत राहील तोवर गीता संदेशाची गरज पडणार आहे.  पांडव सदवृत्तीचे तर कौरव विपरीत वृत्तीचे उदाहरण आहे.

गीतेचा अभ्यासक्रमात समावेश करावा.

 

शालेय, महाविद्यालयीन अभ्यासक्रमात गीतेचा समावेश केल्यास सुसंस्कृत भारताच्या पिढ¬ा घडण्यास मदत होईल.

 

 

 

पांडवरुपी विचारधारेने समाजाला स्थिरता मिळू शकते :

सत्ता व संपत्तीसाठी आज घराघरात, समाजात, राष्ट्रांत व जगात संघर्ष निर्माण झाला असून समाज अस्थिरतेच्या मार्गावर आहे.  तरी पांडवरूपी विचारधारेनेच जगात स्थिरता लाभू शकते असे प्रतिपादन त्यांनी केले. दिशाहिन झालेलया समाजास स्थिरता व प्रगतीच्या वाटेवर येण्यासाठी गीतेचे ज्ञान उपयुक्त ठरणार आहे.  जीवनरूपी संघर्षात गीतेचे ज्ञान व्यक्ती, समाजास विचाररूपी प्रकाश दाखविणार आहे.  माणसाच्या मनात आज अनेक विचाररूपी द्वंद सुरू असतात, त्यातून मार्ग काढण्यासाठी आध्यात्मिक मार्ग महत्वाचा आहे, असेही त्या म्हणाल्या.

admin

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *