Bkvarta

तिसरा दिवस 20 डिसेंबर – गीता ज्ञान रहस्य प्रवचनमाला

तिसरा दिवस 20 डिसेंबर – गीता ज्ञान रहस्य प्रवचनमाला

अध्याय 4 व 5

मनोविकारांविरुद्ध पुकारलेल्या युद्धात अंतीम विजय इंद्रियाजित आत्म्याचीच

श्रीरामपूर (दि.                      ) मनोविकांराविरुद्ध पुकारलेल्या युद्धात शेवटी त्याचाच विजय होतो जो आपल्या इंद्रियांना जिंकतो, तोच जितेंद्रीय ठरतो असे प्रतिपादन येथील थत्ते ग्राऊंड वर आयोजित केलेल्या गीताज्ञान रहस्य प्रवचनमालेच्या आज तिस­या दिवशी राजयोगीनी ब्राहृाकुमारी उषाबहनजी यांनी केले.

4.            आजच्या तीस­या दिवशी परमात्म्याच्या सत्य स्वरूपा विषयी त्या म्हणाल्या की, आपल्या स्वरूपाविषयी परमात्मा म्हणतात मी अजन्मा आहे, अविनाशी आहे आणि अव्यक्त आणि शा·ात आहे. मी पूर्नजन्म रहित असून जन्म न घेता मी अवतरीत होतो, मी योगमायेने प्रगट होतो यावरून परमात्म्याचे स्वरूप स्पष्ट होते की, तो कोणत्याही देहरूपाने जन्म घेत नसून परकाया प्रवेशाच्या माध्यमाने अवतरीत होतो त्यालाच अवतरण असे संबोधिल्या जाते. याचा उल्लेख गीतेमध्ये प्रकट होणे, ज्योतिर्लिंगम् अवतरण असा आलेला आहे. तसेच श्रीकृष्ण उवाच एैवजी भगवानुवाच उल्लेख येण्याचे आध्यात्मिक रहस्य यातच सामावलेले आहे. सर्वगुण संपन्न, मर्यादापुरुषोत्तम श्रीकृष्ण देवतेच्या मुखकमलाचा आधार घेऊन निराकार परमात्माच असे म्हणून शकतो की मी अजन्मा, अभोक्ता, अव्यक्त आणि शा·ात आहे, हे याचेच द्योतक आहे की परमात्म्याने तत्कालिन व्यवस्थेतील मर्यादापुरूषोत्तम श्रीकृष्णाच्या तनाची निवड करून समाजव्यवस्थेतील दुर्जनाच्या नाश करण्यासाठी अर्जुनाचे सारथ्य स्विकारले, मनोविकारांविरुद्ध युद्ध पुकारले आणि कलुषित, दु:शासक प्रवृत्तींच्या तावडीतून समाजास मुक्त करण्यासाठी सत्य गीता ज्ञान दिले. श्रीकृष्णांचे महात्म्य असे अनेक आध्यात्मिक रहस्यांनी सर्वशास्त्रशिरोमणी श्रीमदभगवद गीतेचे निरूपण केल्यास आपणास जीवनरूपी समरांगणात विजयश्री निश्चित मिळेल असा आशावादही त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला.

गीतेमध्ये यदा यदा ही धर्मस्य श्लोकाचा गर्भित अर्थ स्पष्ट करतांना त्या म्हणाल्या की जेव्हा जेव्हा परमधर्म आणि परमात्म्याच्या ग्लानीने मानवी ह्मदय भरून जाते, अधर्म प्रवृत्तीत वृद्धी होऊन  सर्वत्र अराजकता माजते तेव्हा मी आपले सत्य स्वरूपाची रचना रचतो आणि स्वत: अवतरीत होतो. परित्राणय साधुनाम अर्थात परमसाध्य परमात्माच्या समीप घेऊन जाणारे विवेक, वैराग्य आणि दैवी संस्कारांना निर्विघ्न, या वि·ाात प्रवाहित करुन दृष्कृत्य, काम, क्रोधादी विकारांच्या संपूर्ण नाश करण्यासाठीच मी युगे-युगे प्रकट होतो.

5.            परमात्म्याचे अवतरण आणि कर्मयोगाबद्दल माहिती देतांना ब्राहृाकुमारी उषादीदी म्हणाल्या की, हे पार्थ जो जितकी लगन आणि भजन करतो अर्थात परमात्म्याची तन्मयतेने आठवण करतो त्याला तितक्याच स्वरूपात मी मदद करतो, याचा अर्थ कित्तेक लोकांनी असा धरला की भगवान सुद्धा जशास तसे वागतो. जो जितकी आठवण करतो त्यास तीतकी मदत मिळते आणि इतरांना काहीच मदत मिळणार नाही काय ? याचा भाव असा नव्हे परमात्म्याची शक्ति संपूर्ण जगातील मनुष्यात्मयांसाठी सदैव खुली आहे, ज्याने जितके आपल्या परिने या शक्तिस ग्रहण केले त्यास तितकीच मदत मिळणार हे सत्य आहे. देण्याच्या बाबतीत परमात्म्याचा भेदभाव करण्याचा प्रश्न येतो कुठे, येथे हे निश्चित आहे की जितके केले तितके प्रालब्ध आपणास अवश्य मिळते.

चतुवर्ण व्यवस्थेविषयीचे आध्यात्मिक रहस्य स्पष्ट करतांना ब्राहृाकुमारी उषादीदी म्हणाल्या की कोणताही मनुष्य आत्मा जन्माने शुद्र अथवा ब्रााहृण ठरत नसून याची निवड पूर्व जन्मीच्या गुण आणि संस्कारावर ठरत असते. परमात्मा कोणाला ब्रााहृण व शुद्र ठरवित नसून मनुष्य आपल्याच कर्माने स्वत:स चार अवस्था अर्थात चतुवर्ण मध्ये वाटतो. वर्तमान परिस्थितीत आपण पहातो कोणी जन्माने ब्रााहृण भले असो परंतु त्याचे कर्म आणि संस्कार शुद्र असतात आणि कोणी कर्माने भलेही शुद्र असो तो एखाद्या सोवळ्यातील ब्रााहृणालाही लावजेल असे सात्विक विचारांच्या असतो, म्हणून जाती धर्म आणि परंपराच्या जोखडात आपण स्थूलतेने वाटलो गेलो आहे गीतेत भगवान म्हणतात हे अर्जुन कर्माची गुह्र गती समजून घे, कर्म – अकर्म आणि विकर्म यातील फरक स्पष्ट झाला की ख­या अर्थाने ज्ञानी होणे होय. ज्याने शरीर रूपी इंद्रियांना आणि अंत:करणास वश केले, जो अपग्रही आहे, तो शरीर संबधी कर्म करुनही अलिप्त राहतो, कर्माच्या बंधनात अडकत नाही.

ईश्र्या करुन भाग्यास कमी करता येत नाही :

मनुष्य आपलाच मित्र आणि आपलाच शत्रु आहे, तकदीर को सवाँरने वालाभी तु और तकदिर को लकीर लगाने वाला भी तु अशा शब्दात त्यांनी वर्णन करतांना म्हटले की, गीते मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की, कुणाची ईष्र्या करून त्याचे भाग्य, त्याची प्रगती अथवा त्याचे गुण आपण नष्ट करू शकत नाही अथवा त्याची निंदा टवाळी करून त्याचे भाग्य आपणाकडे परिवर्ततीत होत नसते, इतकेच काय अशा भाग्यवंत, प्रगतीवंत आणि गुणवंत आत्म्याचे भाग्यास स्वत: परमात्माही नष्ट करू शकत नाही ते नष्ट होते ते त्या आत्म्याच्या स्वत:च्या कर्माने. कर्मच्या गुह्र गतीस न समजले तर यशोशिखरावर चढलेला केव्हा जमीनीवर येईल ते सांगता येत नाही. यासाठी हे पार्थ निÏश्चत रहा, तुझ्या भाग्याचा तुच शिल्पकार आहे. कुणाच्या बोलण्याने भाग्य परिवर्तीत होणार नाही तर तुझ्याच कर्तृत्वाने भाग्याच्या रेखा लांबविणे अथवा त्या कमी करणे तुझ्याच हातात आहे.

काही गोष्टी विसरणे चांगली कला :

काही गोष्टी विसरण हे उत्तम औषधा सारखे कसे आहे हे स्पष्ट करण्यासाठी त्या म्हणाल्या की,  अगदी पंचवीस तीस वर्षापुर्वीचाही गोष्टी आपण मनात ठेवून या माणसाने मला असे म्हटले, याने असा व्यवहार केला, अशी वागणूक दीली अगदी ती व्यक्ती आपणास सोडूनही गेली असेल तरीही तीचा राग इतके वर्ष आपण पकडून ठेवतो व वेळोवळी या उल्लेखाने आपण स्वत: दुखी होतो, यासारख्या कित्तेक बाबी आहे की व्यर्थ गोष्टींना आपल्या मनात घर करून दिले आहे की चांगल्या विचारांना काहीच जागा नाही, म्हणून या गोष्टी विसरा आणि ज्ञान, गुण सकारात्मक बाबींनी आपली बुद्धीस तेज द्या मग पहा आपले संपूर्ण व्यक्तिमत्व कसे होते ते. याप्रसंगी त्यांनी सन्यास योग आणि कर्मयोगातील फरकाचेही स्पष्टीकरण केले.

admin

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *