Bkvarta

चौथा दिवस 21 डिसेंबर- गीता ज्ञान रहस्य प्रवचनमाला

चौथा दिवस 21 डिसेंबर- गीता ज्ञान रहस्य प्रवचनमाला

अध्याय 6 ,7 व 8

आत्माच स्वत:चा मित्र आणि स्वत:चाच शत्रू सुद्धा आहे

 

श्रीरामपूर (दि.      ) आपले भविष्य बनविणे आपल्या हातात आहे, आत्मा सतसंगात राहिली तर ती स्वच:चा चांगला मित्र बनू शकते मात्र कुसंगात राहिली तसा स्वत:चा शत्रू सुद्धा ठरू शकते असे प्रतिपादन येथील थत्ते ग्राऊंड वर आयोजित केलेल्या गीताज्ञान रहस्य प्रवचनमालेच्या चौथ्या दिवशी राजयोगीनी ब्राहृाकुमारी उषाबहनजी यांनी केले.

 

ज्ञान-विज्ञान आणि योगाविषयी स्पष्ट करतांना त्या म्हणाल्या की, जेव्हा मनसहित सर्व कर्मइंद्रियांवर विजय प्राप्त होतो तेव्हा आत्मा स्वत:ची मित्र असते आणि ज्यावेळेस मन सहित इंद्रिया परवश, आहेत अधिन आहेत, मग ती व्यवन, अवगुण, ईश्र्या, द्वेष असो तेव्हा मात्र आत्मा स्वत:च स्वत:चा शत्रू बनते. तेव्हा आत्मउन्नती करणे हे आपले परमकर्तव्य आहे. त्यासाठी ध्यानयोग हा अत्यत महत्वाचा आहे, यामुळेच आत्मा इंद्रियाजित बनू शकतो. ध्यान लावण्याच्या ज्या प्रचलित पद्धती आहेत त्याचे वैज्ञानिक दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. ध्यानामुळे आत्म्या बरोबर शरीर ही कंचन होते. भारतीय अतिप्राचिन सहज राजयोगाचे अनन्यसाधारण महत्व आहे, या ध्यानविज्ञानाला पाश्चिमात्य शब्द “मेडिटेशन” आहे. राजयोगासाठी मात्र डोळे उघडे ठेवावे लागतात कारण भगवान दिव्यदृष्टी दाता आहे आणि डोळ्यातूनच ती उर्जा आपण सामावू शकतो. भगवान ने सांगितले की ज्या प्रमाणे निर्वातस्थळी जळणा­या दिपकची ज्योत ही सरळ जाते, तसेच योगाभ्यास द्वारा जेव्हा चित्त वश होते तेव्हा योगी आपल्या आत्म स्वरूपात स्थित होतो, योगयुक्त होतो. आणि व्यक्ति जेव्हा ज्या स्वरूपात स्थित होतो तेव्हा तो त्याच स्वरूपाची आठवण त्यास नेहमी राहते. म्हणून नेहमी योगयुक्त अवस्था असल्यास पापकर्म होण्याची शक्यता नष्ट होते.

 

यासाठीच परमात्मा म्हणतात हे अर्जुन तु योगयुक्त राहिल्यास तर तुला देह आणि त्याचे संबंध त्रास देणार नाहीत, मोहाचे जाळे त्रास देणार नाही. मनाची चंचलता समाप्त करण्यासाठी राजयोगाभ्यास अत्यंत लाभप्रद आहे. कर्मइंद्रियांची चचंलताच मनास भटकविण्याचे मुख्य कारण आहे. मन एक द्वंदभूमि  सारखे आहे, जितके सकारात्मक विचार येतील त्यास नष्ट करण्यासाठी नकारात्मक विचार त्याच जोराने येतील.  ज्या प्रमाणे अमृतमंथनात अमृताबरोबर विषही बाहेर निघाले त्या प्रमाणे राजयोग अभ्यास कराल तेव्हा योगभ्यासाच्या शुद्ध संकल्पानी आत्मा गदगद होते मात्र या मंथनाने जसे सकरात्मक संकल्प चालण्यास सुरुवात होते त्याच प्रमाणे नकारात्मक विचारांचे विषही बाहेर निघते. तेव्हा घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. इतक्या वर्षापासून आत्म्यामधील नकारात्मकता ठासूनठासून भरली होती ती ध्यानध्यारणेद्वारेच निघते आणि नष्ट होते. आपण मात्र सकरात्मक विचार करणे बंद करू नये.  ज्या प्रमाणे असुर आणि देवतांच्या अमृत मंथनातील निघालेले विष शिवाने प्राशन केले. त्या प्रमाणे ध्यान लावतांना जे मनोमंथन होईल त्यातून नकारात्मक विचार निघाल्यास भगवान शिवाला आठवण करा म्हणजे हे विष नष्ट होईल आणि ध्यानाचा निर्भळ आनंद आपण घेऊ शकू.

 

गीतेतील वर्णनामध्ये पाण्डवांच्या लहाणपणातील एका प्रसंगात भिम अंधारातही व्यवस्थित खात होता , त्यास अर्जुनाने विचारले की अंधारात तुझा तोडात घास कसा बरोबर जातो, भिम म्हणला मी पट्टीचा खवैय्या आहे, कुठल्याही परिस्थितीत जेवणाचा अभ्यास मी केलेला आहे अर्थात निरंतर अभ्यास केल्यामुळेच मी हे करू शकतो. यावर भगवान म्हणतात की मनाची एकाग्रता विकसीत करण्यासाठी ध्यानधारणेचा अभ्यास निरंतर असावयास हवा. केवळ एक दिवस ध्यान केले म्हणजे सिद्धी प्राप्त व्हावयास हवी हे नव्हे तर त्यासाठी सातत्य हवे. निरंतर अभ्यास आणि आत्म संयमाच्या योगेच आपण विकर्मांनी सुट शकतो. चंचल मनास वश करणे यातच पुरूषार्थ आहे. व्यर्थ, नकारात्मक संकल्पांनी मन कमजोर व चंचल बनते. मनाचे भोजन आहे सात्विक विचार.

 

आपल्या धनाचा सुदपयोग करण्याविषयी त्या म्हणाल्या की, वेळेचा सदपुयोग जसा करावा तसे आपण जो खर्च करतो तो यथार्थ आहे की पापकर्मासाठी वापरला जातो त्याचेही भान असावयास हवे, एवढेच काय आपण दान देतो ते देखील पात्र पाहूनच दान दिले पाहिजे, याला भगवान म्हणता सतपात्री दान द्या. जो आपला धनाचा दुरूपयोग करतो, पापवृद्धींगत करण्यासाठी वापरतो तो दुर्योधन.

 

आध्यात्माची सुंदर व्याख्या करतांना त्या म्हणाल्या की,  अध्ययन द्वारा आत्माच्या अधिपत्यामध्ये स्थित होऊन स्वत:स स्वच्या भावामध्ये स्थित होतो आणि मायाच्या अधिपत्याखाली निघून उन्नती प्राप्त करतो ते अध्यात्म. अर्थात अध्यात्म म्हणजे अध्ययनद्वारा आत्मउन्नतीस प्राप्त करणे.

admin

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *