Bkvarta

Jalgaon

 Jalgaon

Jalgoan – Dist. Maharashtra 


 Click for Previous Services 


 

केसांच्या वेणीने ट्रक ओढण्याचा विक्रम :

 


 


 

ब्रह्माकुमारीज् तर्फे बेटी बचाओ – सशक्त बनाओ अभियान

19 मार्च रोजी आयरन क्विन रानी रायकरांचे केसांनी ट्रक ओढण्याचे प्रात्यक्षिक

20 मार्च रोजी शिवतीर्थ मैदानावर जिल्हास्तरीय उद्घाटन
 
जळगाव (दि.      )  ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे बेटी बचाओ – सशक्त बनाओ अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन केलेले आहे. त्यात भोपाळ येथील आयरन क्विन रानी रायकर यांचे केसांनी ट्रक ओढण्याचे अदभूत प्रात्यक्षिक, अभियानाचे उदघाटन, मुली दत्तक पालक सत्कार, आणि जिल्हास्तर अभियानाचा समावेश आहे.
 
केसांच्या वेणीने ट्रक ओढण्याचा विक्रम :
 
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन ब्रह्माकुमारीज्च्या महिला प्रभागातर्फे देशपातळीवर बेटी बचाओ – सशक्त बनाओ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने जळगाव जिल्हास्तरीय अभियन निघणार आहे. शनिवार दि. 19 मार्च रोजी दुपारी 4 वाजेपासुन प्रबोधन रॅली निघणार असून शिवतीर्थ मैदानापासून सुरुवात होऊन नेहरु चौक, टॉवर चौक – धुलिया सायकल मार्ट (फ्रुट गल्ली) चित्राचौक – शिवतीर्थ मैदान समारोप होेईल. त्यानंतर याच ठिकाणी संध्याकाळी 5.30 वाजता आयरन क्विन म्हणून प्रसिध्द असलेल्या भोपाळ येथील रानी रायकर ह्यांचे चित्तथरारक प्रात्यक्षिक होईल. गीनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपल्या केसांच्या वेणीने ट्रक ओढण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. जळगाव मध्ये पहिल्यांदाच त्या आपले प्रात्यक्षिक सादर करतील 
 
बैटी बचाओ – सशक्त बनाओ अभियानाचे उद्घाटन :
 
रविवार दि. 20 मार्च, 2016 रोजी शिवतीर्थ मैदानावर संध्याकाळी 5 वाजता जिल्हास्तरीय अभियानाचे भव्य उद्धघाटन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास दिल्ली येथून ब्र.कु. चक्रधारीदीदी, अहमदाबाद हून आध्यात्मिक गायीका डॉ. दामिनी मेहता यांच्या समवेत जिल्हाधिकारी, शासकीय प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच जळगाव जिल्ह्यातील मान्यवरांसमवेत आमदार, खासदार, पालकमंत्री आदिंच्या शुभहस्ते उद्घाटन होणार आहे. त्यानंतर जिल्हास्तर अभियान दि. 19 मार्च ते 5 एप्रिल, दरम्यान जळगाव जिल्हयात निघाणार आहेत.
 
ब्रह्माकुमारीज् तर्फे मुली दत्तक पालकांचा सत्कार : 
 
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे बेटी बचाओ – सशक्त बनाओ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने शिवतीर्थ मैदानावर ज्यांनी मुली दत्तक घेतल्या आहेत त्यांचा विशेष सन्मान रवीवार दि. 20 मार्च, 2016 रोजी दुपारी 4 वाजता बेटी बचाओ-सशक्त बनाओ उदघाटन कार्यक्रमात करण्यात येणार आहे. विद्यालयातर्फे आवाहन करण्यात येते की ज्यांनी मुली दत्तक घेतल्या आहेत त्या पालकांनी आपली नावे ब्रह्माकुमारी विद्यालय, ढाके कॉलनी, जळगाव येथे द्यावीत. उपरोक्त सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागाचे आवाहन ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी यांनी केले आहे. 
 

 

अखिल भारतीय अभियान : बेटी बचाओ – सशक्त बनाओ

 

रविवार दि. 20 मार्च, ते 4 एप्रिल 2016

 

जलगांव जिलास्तर अभियान मार्ग तथा दिनांक

19 मार्च (जलगाव शहरमें शोभायात्रा)
20 मार्च (बेटी बचाओ-सशक्त अभियान का भव्य उदघाटन -शिवतीर्थ मैदान, जलगाव)
21 मार्च (जलगांव तालुका – एरिया-अ)
22 मार्च (म्हसावद -बांभोरी-वैद्यनाथ-कढोली-पिंपळकोठा प्रचा-रिंगणगाव-म्हसावाद-मुक्काम)
23 मार्च (जलगांव तालुका – एरिया -ब)
24 मार्च (कुसुंबा – चिंचोली – उमाळा – नेरी – पहूर शेंदूर्णी – पिंपळगांव-मुक्काम)
25 मार्च (पाचोरा-मुक्काम)
26 मार्च (भडगांव-मुक्काम)
27 मार्च (चालीसगांव-मुक्काम)
28 मार्च (पारोळा-मुक्काम)
29 मार्च (एरंडोल-मुक्काम)
30 और 31 मार्च (धरणगांव-मुक्काम)
01 एप्रिल (अमळनेर -मुक्काम)
02 एप्रिल (अडावद-धानोरा-चोपडा-मुक्काम)
03 एप्रिल (विरवाडा, आडगांव, चोपडा-मुक्काम)
04 एप्रिल- (चोपडा-समापन)


ब्रह्माकुमारीज् तर्फे मुली दत्तक पालकांचा सत्कार

जळगाव (दि. ) ब्रह्माकुमारीज् विद्यालयातर्फे ज्यांनी मुली दत्तक घेतल्या आहेत त्यांचा विशेष सन्मान शिवतीर्थ मैदानावर दि. 20 मार्च, 2016 रोजी आयोजित केलेला आहे.

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे बेटी बचाओ – सशक्त बनाओ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने शिवतीर्थ मैदानावर ज्यांनी मुली दत्तक घेतल्या आहेत त्यांचा विशेष सन्मान रवीवार दि. 20 मार्च, 2016 रोजी दुपारी 4 वाजता बेटी बचाओ-सशक्त बनाओ उदघाटन कार्यक्रमात करण्यात येणार आहे. विद्यालयातर्फे आवाहन करण्यात येते की ज्यांनी मुली दत्तक घेतल्या आहेत त्या पालकांनी आपली नावे ब्रह्माकुमारी विद्यालय, ढाके कॉलनी, जळगाव येथे 17 मार्च, 2016 पर्यंत द्यावीत अथवा या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा.


 शनिवार दि. 19.3.2016

दोपहर 4 : अभियान शोभायात्रा के लिए शिवतीर्थ मैदान पर एकत्रित
दोपहर 4.30 : अभियान शोभायात्रा प्रारंभ
शाम 6.30 : शोभायात्रा समापन
शाम 7.00 : गिनीज बुक रिकार्ड होल्डर आयरनक्विन बी.के. रानी बहन (भोपाल)
अपनी चोटीसे ट्रक खिंचने की अदभूत प्रस्तुती

रविवार दि. 20.3.2016

शाम 5 से रात 9 : अभियान उद्घाटन स्थान – शिवतीर्थ मैदान (जी.एस.ग्राउण्ड) जलगांव

सोमवार दि. 21.3.2016

10 से 11.00 : ब्र.कु.चक्रधारीदीदीजीका जलगांव सेवाकेंद्र पर समर्पीत बहनों का क्लास
3.30 से 5.00 : ब्र.कु.चक्रधारीदीदीजीका व्याख्यान:जैन महिला मंडल(व.वा.वाचनालय के पास)
विषय – सम्बधों मे समरसता
शाम 6 से 7.30 : जलगांव उपक्षेत्र के कुमारों का क्लास
रात 8.30 से 9.30 : ब्र.कु.चक्रधारीदीदीजीका व्याख्यान: व्याख्यान : रोटरी क्लब,
मायादेवी नगर
विषय : तनाव रहीत जीवन जीने की कला

मंगलवार दि. 22.3.2016

सुबह 7 से 8.30 : बी.के. भाई बहनों का क्लास तथा सम्मान समारोह


 

admin

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *