Bkvarta

मराठी लेख

मराठी लेख


फुलपाखरू व मुंगी

एकदा एका मुंगीने कोशातून बाहेर पडण्यासाठी हालचाल करणाऱ्या एका किड्याला पाहिले व ती म्हणाली, “अरेरे! काय ही याची अवस्था? या तुरुंगात याला आयुष्य काढावे लागतंय. याउलट मी किती नशीबवान आहे. मला मनाप्रमाणे हिंडता फिरता येते.’  काही दिवसांनी मुंगीने त्या कोशाकडे पाहिले तर कोश रिकामा दिसला. ती विचार करू लागली की, “बिचारा किडा कुठे गेला असेल देव जाणे?’ ती असे म्हणते न म्हणते तोच एक सुंदर फुलपाखरू तिच्याजवळ आले व तिला म्हणाले, “काय? मुंगीमावशी मीच तो किडा. आता माझं सुंदर, फुलपाखरू झाले आहे. मी मनसोक्त या फुलावरून त्या फुलावर उडतो. पहा मी तुझ्यापेक्षाही नशीबवान आहेे’. फुलपाखराचे शब्द ऐकून मुंगीची वाचाच बंद झाली.

तात्पर्य : दुसऱ्याबद्दल मते व्यक्त करण्यापूर्वी खरी परिस्थिती जाणून घ्यावी. नाहीतर तोंडघशी पडण्याची वेळ येते.


आळशी विनू
विनूला शाळेत जायचा फार कंटाळा येई. इकडून तिकडे हुंदडण्यातच त्याला आनंद वाटे. शाळेत आई त्याला मारून बसवी. अ. आ. इ. ई. कितीही शिकवले तरी त्याला साधा अ हे अक्षर उच्चारता येईना की लिहिता येईना. यावर त्याला इतर मुलं म्हणाली, “अरे विनू “अ’ हे अक्षर किती सोपं आहे. पण मी जर “अ’ उच्चारला व लिहिला तर मला आ, इ, ई, उ, ऊ, ऐ अशी सर्वच अक्षरे लिहावी व वाचावी लागतील. नसती कटकट मागे लागेल म्हणून मी “अ’ पाशीच अडलो आहे.
तात्पर्य : मनात एखादी गोष्ट करायची इच्छा नसेल तर कोणी कितीही ती गोष्ट लादली तरी ती येणे शक्यच नसते.

कोल्हा व बैल


एकदा एक सिंह बैलाला मारण्यासाठी त्याचा पाठलाग करत होता. बैल आपला जीव वाचवण्यासाठी जोरात धावत होता. इतक्यात त्याला एक गुहा दिसली. बैल गुहेत शिरला. तेथे एक कोल्हा आराम करत होता. तो बैलावर खेकसला…”अरे बैला, असा न विचारता कोणाच्याही घरात काय घुसतोय? चल नीघ इथून’ असे म्हणून त्याला वाटेल ते बोलू लागला. बैल मात्र शांतपणे म्हणाला, “अरे क्षुद्र कोल्ह्या, तू मला काहीही बोललास तरी मी ते निमूटपणे सहन करीन. थोडा वेळ थांब. एकदा का तो सिंह निघून गेला की मग मी निर्धास्त होईन.तेव्हा माझी ताकद दाखवीन.

तात्पर्य : संकटकाळ संपेपर्यंत बलवानालाही क्षुद्रापुढे नम्र व्हावे लागते.


अतिथी धर्म
एका गोठ्यात गाय चारा खात होती. तेथे एक कोंबडा आला व तो चारा आपल्या पायाने इकडे तिकडे पसरवू लागला. ती फेकाफेक पाहून गाय शांत बसली पण कोंबडा काही आपला उद्योग थांबवेना. तेव्हा गाईने आपल्या शेपटीच्या फटकाऱ्याने त्याला लांब उडविले.
यावर कोंबडा म्हणाला, “तू तर गरीब गाय आहेस, मग मला असे रानटीपणे का फेकून दिलेस? आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करायचे सोडून तुसड्यासारखी काय वागतेस?’
यावर गाईने उत्तर दिले, “मग पाहुण्यांनीही यजमानाकडे आल्यावर त्रास देऊ नये. हा अतिथी धर्म आहे हे लक्षात ठेव.’
तात्पर्य : अतिथीधर्माचे पालन दोघांनी केले पाहिजे.

हत्तीचा उपदेश
एकदा सर्व पशूपक्ष्यांची सभा भरली होती. आपल्यात असलेले दोष दूर करणे या विषयावर भाषण चालले होते. हत्ती भाषण करायला उभा राहिला. आपल्या उपदेशपर भाषणात तो सर्व पशूपक्ष्यांना आपल्यातील स्वार्थ, क्रूरता, मत्सर, आळस इ. दुर्गुण दूर करण्याविषयी सांगू लागला. विश्वासू कुत्रा, कष्टाळू बैल, आज्ञाधारक उंट, उद्योगी मुंग्या व मधमाशा गोड गळ्याचा कोकीळ हे सगळे पशुपक्षी ऐकू लागले. पण धूर्त कोल्हा, लबाड लांडगा, उपद्रवी गांधीलमाशा, डोमकावळा, गरूड, अजगर, मांजर इत्यादी प्राण्यांना मात्र हे उपदेशाचे डोस आवडले नाहीत व ते सभा अर्ध्यावरच सोडून निघून गेले.
तात्पर्य : ज्याच्या ठायी दुर्गुण असतात. त्यांना कितीही चांगले सांगितले तरी पटत नाही. मूळ स्वभाव बदलत नाही.

ढोंगी कावळा
पांढऱ्या शुभ्र कबुतरांचा कावळ्याला नेहमी हेवा वाटे. त्यांच्यासारखा आपलाही रंग असावा म्हणून त्याने पांढरा रंग आपल्या पिसांना लावला व कबुतरांच्या खुराड्यात जाऊन ऐटीत मिरवू लागला. कबुतरांना आपण कसे बनवले या अर्विभावात तो आनंदाने मोठमोठ्याने गाऊ लागला. गाणे कसले ओरडणेच होते ते. त्याचा आवाज ओळखून खुराड्यातून पिटाळून लावले. बिचारा कावळा खजील होऊन पुन्हा आपल्या जातभाईंकडे आला. पिसांच्या पांढऱ्या रंगामुळे त्यांनीही त्याला हाकलून दिले. ढोंग करायला गेला आणि झाले भलतेच.
तात्पर्य : दुसऱ्याला फसवायला गेले की स्वत:चीच फसवणूक होते.


मांजरीचा गर्व

एका डुकरीची व मांजरीची मैत्री होती. दोघी कधी भेटल्या की गप्पा मारीत, अशीच  एकदा दोघींची भेट झाली. मांजरी डुकरीणीला म्हणाली, “अहो, डुकरीणताई माझ्याप्रमाणे तुम्हालाही जरी भरपूर मुलं होत असली तर मला जेवढ्या भराभर ती होऊ शकतात, तशी काही तुम्हाला होत नाहीत’. यावर डुकरीणताईने उत्तर दिले, “अहो, मांजरीताई ही गोष्ट काय अभिमानानं सांगता तुम्ही? अहो, तुम्ही पिलांना जन्माला घालण्याची घार्ई करता, म्हणून तर तुमची पिले जन्मजात तेव्हा आंधळी असतात.
तात्पर्य : घाईघाईने केलेली कोणतीही गोष्ट चांगलीच असेल असे नाही.


क्षुद्र काजवा
बागेत फिरत असताना एका युवतीच्या अंगठीतील हिरा बागेत पडला. त्या हिऱ्याचा प्रकाश सूर्यप्रकाशातही चमकत असे. रात्र झाल्यावर मात्र त्या हिऱ्याजवळ एक काजवा आला व त्या हिऱ्याला हिणवू लागला, “अरे हिऱ्या, दिवसा तर मोठा दिमाख दाखवतोस, आपल्या तेजाने साऱ्यांचे डोळे दिपवतोस? आता कुठे गेले तुझे तेज? यावर हिरा काजव्याला म्हणाला, “अरे काजव्या, माझे श्रेष्ठत्व सिध्द करायला तुझी गरज नाही. तुझा प्रकाश तर रात्री पडतो, पण दिवसा मात्र लोकांच्या दृष्टीने तू एक क्षुद्र कीडा आहेस याचा तुला विसर पडला का? तुझा काहीही उपयोग नाही. कुठे हिरा, कुठे काजवा!’
तात्पर्य : प्रत्येकाने आपली पायरी ओळखून वागावे.

गरीब आहे तेच बरे
एक ससा आपल्यासाठी बीळ तयार करत होता. तेव्हा बीळाच्या एका बाजूला त्याला एक हंडा दिसला. त्या हंड्याजवळ एक नाग बसला होता. तेव्हा सशाने नागाला विचारले, “अहो नागराज, आपण येेथे काय करता?’ त्यावर नागोबा म्हणाले, “मी या धनाचं रात्रंदिवस रक्षण करीत असतो’.
यावर ससोबा म्हणाले, “एवढे धन तुमच्याजवळ असताना त्याचा वापर का करत नाही? किंवा कुणा गरजूला दान का करीत नाही? यावर नागोबा म्हणाला, “या धनाचं रक्षण करण्यातच मला आनंद मिळतो. नागोबाचे उत्तर ऐकून ससोबा म्हणाला, “असली श्रीमती काय कामाची? त्यापेक्षा मी गरीब आहे तेच बरे आहे.’
तात्पर्य : ज्याचा उपयोग करता येत नाही असले धन काय कामाचे? ते कवडीमोलाचं असते.


प्रिय दैवी बहिणी आणि भाऊ
बीकेवार्ता मराठीने आपणासाठी दिपावळीची एक अनोखी भेट आणली आहे आणि ती म्हणजे बीकेवार्ता मराठी आर्टिकल बँक 
यामध्ये विविध विषयांवर आधारित जवळपास एक हजाराहून अधिक आर्टिकल्स / लेख आहेत. बहुसंख्य बहिणींची मागणी होती की त्यांना वर्तमानपत्रांमध्ये देण्यासाठी विविध विषयांवर दर्जेदार मराठी आर्टिकल्स हवेत. आम्ही काही अंशी आज दिपावलीच्या शुभ मुहूर्तावर सदर मागणी पूर्ण करीत आहोत.ृ
आशाच नाही तर वि·ाास आहे की आपणास ही संकल्पना निश्चित आवडेल
आपण बीकेवार्ता मराठी वेबसाईट वरील बीकेवार्ता मराठी आर्टिकल बँकेला अवश्य भेट द्या.
धन्यवाद.
 


खरे स्वातंत्र्य – ब्र.कु. नलिनी, पुणे

  स्वभावत:  मनुष्य हा स्वातंत्र्यप्रिय प्राणी आहे. तो स्वतंत्रता देवीचा उपासक आहे. स्वातंत्र्यप्रिय जीवनाचा उपासक आहे. कोणत्याही प्रकारचे बंधन पत्कारायला तो तयार नसतो.  बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना मुक्ज जीवनाचा आनंद लुटावयास वाटतो. त्यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात. प्राकृतिक बंधन सुटाक्षणीच मनुष्यात्मा मुक्तीच्या प्रवासाची वाटचाल करु लागतो. स्वातंत्र्याच्या अपूर्व अनुभवाचा रस प्राशन करण्यासाठी आज तो रावणराज्याच्या सोनेरी पिंज­यात भाकरी मोठ¬ाकष्टाने खात आहे नव्हे पोटात ढकलत आहे.  त्याचे अशांतीचे, दु:खाचे अश्रू थिजून गेले आहेत.  बंधनाचा हिसका आणि दु:खाचा धसका घेतल्याने स्वातंत्र्यप्राप्ती त्याला आवाक्याबाहेरची वाटते.

 स्वातंत्र्याची अपेक्षा करणे म्हणजे आत्मबलिदानाची तयारी ठेवणे, अज्ञानाची, अशुद्ध विचारांची, गैरसमजुतीची बंधने झुगारून देणे, आसुरी आणि दैवी संप्रदायांच्या संघर्षात दैवी संप्रदायाच्या बाजूने निर्भिडपणे उभे राहणे. कवडीतुल्य जीवन हिरेतुल्य बनविण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणे, विषय विकारांनी बरबटलेल्या दृष्टिवृत्तीची होळी करणे. आपल्या देशाचा इतिहास या गोष्टीला साक्षी आहे.  इतिहासाची गती चक्राकार असते.  या चक्रात आपण बांधले गेलो मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अनेक राष्ट्रप्रेमींनी, वीरांगनानंनी, वीरबालकांनी हालअपेष्टा सोसल्या, छातीवर गोळ्या झेलल्या. प्राणर्पण करायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.  परंतु मातृभूमीची दास्यत्वातून सुटका झाल्यावर, नव्यानवलाईचे दिवस सरल्यावर आज काय स्थिती आहे, हे सर्वांना आज ठाऊक आहे. परकीय राज्यकर्ते निघून गेले असले तरी सारासार विचार नष्ट झाल्याने पाच मनोविकाररूपी रावणाची सत्ता आपण झुगारून टाकू शकलो नाही. त्यामुळे देहाभिमानाचा कटु वृक्ष कलियुगी फसव्या आकर्षणांच्या शाखांनी दिवसेंदिवस झपाट¬ाने फोफावत आहे. वरवर पाहता सुखद वाटणारी रावणाने दिलेली फळे अंती दु:ख देणारी असली तरी ती आपण आनंदाने चाखत आहोत. आरोपी कोर्टात थोडावेळ पिंज­यात उभा राहतो. परंतु आपण सोन्याचा मुलामा दिलेल्या विकारांच्या पिंज­यात जन्मोजन्मी अडकलो आहोत. धर्म, जात, पंथ, संप्रदायांच्या अन्याय, अयोग्य बंधनाविरूध्य लढा उभारून ती तोडून टाकरणे कठीण आहे, परंतु मी आणि माझे चे सूक्ष्म बंधन तोडून टाकता येत नाही हा अनुभव आहे. सत्ययुग-त्रेतायुगात आपण स्वस्वरुपात राहत असल्यामुळे जीवनमुक्ती अनुभवतो. परंतु द्वापारयुगात आपली अवस्था जटायू पक्षाप्रमाणे होते. परंतु शेवटच्या क्षणी जटायू आणि रामाची भेट झाली व जटायूच्या जीवनाचे सार्थक झाले.  तो जीवनमुक्त झालाञ आपण मात्र अद्याप विकारांच्या बंधनात आहोतञ

 मी व माझे च्या बंधनातून मुक्त करण्यासाठी शिवपिता आपल्याला ई·ारीय ज्ञान देऊन राजयोग शिकवित आहे.  दु:खी करणा­या व आत्मस्वातंत्र्य  हिरावून घेणा­या मनोविकारांचे दान मागत आहे. या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी शिवपरमात्म्याला मनोविकारांचे दान देऊन त्याची शिकवण आचरणात आणण्याचा दृढ संकल्प करुया.

admin

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *