Bkvarta

मराठी कविता

मराठी कविता






सत्य शेवटी एक असे


परमात्म्याची सर्व लेकरे, अनेक रूपी जरी दिसे
एका तरुची फळे, फुलेही, बीज तयांचे एक असे
नानारंगी, नानागंधी, नाना पुष्पांची ही माला
फुले भलेही वेगवेगळी, माळ परंतु एक असे


चीन, अमेरिका, जपान रशिया अथवा भारत पाकिस्थान
देशांची ही अनेक नावे, भूमी तर ही एक असे
अरबी, हिंद महासागर, वा पॅसिफिकही म्हणा तया
नाव भिन्न दिले तरीही, जलनिधी हा एक असे


कुणी ऊंच तर कुणी ठेंगणा, रंग, भाषा असती नाना
विविध भासे भेद तरही, आत्मरुपाने एक असे
प्रकार अवघे सत्य समजूनी, आपसांत का वैर करी
सोडा, सोडा भ्रम हे सारे, सत्य शेवटी एक असे


ब्रह्माकुमार गौतम सुत्रावे, रेडिओ स्टार
वणी


        



                     


डॉ. कलाम तुझे सलाम ! 


 कमलसमान ह्मदय तुझे असे
 सांगतेय माझी कलम तुझा कलाम,
 आता आनंद दाटतोय मीन, कारण
 
विश्वात होणार आहे कमला
 तुझ्या इच्छाशक्तीची उंची अमाप
 करील बघ किती चंद्रतारे पार,
 अण्वस्त्रासमान तुझे गतीमान विचार
 देतील पहा, सतयुगी हुंकार !


धर्म, पंथ तुला स्पर्श करेना
तुझ्यात ती अलौकिता अपार,
मानवता तुझ्या रगारगात, आणि
देशप्रेम व्यक्त करताहेत श्वासोच्छवास !
 विज्ञानाची कास तुझी अन्
 अद्वितीय आध्यात्मिक धारणा,
 वि·ानियंताचा कर्मयोगी तू
 आणशील विश्व -बापूंचे रामराज्य खास
सारा देश सवे तुझ्या असे
तुझे कर्तृत्व घेत आहे आशीर्वाद,
घे आता भरारी, अवकाशी स्वप्नांच्या
पसरुनी तुझे, अग्निपंख विशाल!



 – ब्रह्माकुमारी जयश्री, विक्रोळी, मुंबई






हे करून पहा !
फिलिंग रुपी फ्लूवर रामबाण औषध


 साहित्य : प्रेमाच्या बिया 7 तोळे, सत्यतेची मूळी 10 तोळे, कल्याणकारी भावाची पाने 6 तोळे, सेवेची साल 8 तोळे व सत्यसंगाचा रस 1 किलो
 कृती : वरीलपैकी पहिले चार पदार्थ निश्चयरुपी वरवंट¬ाने ज्ञानाच्या पाट¬ावर वाटून चांगले बारीक करा. समाऊन घेण्याच्या शक्तीच्या पातेल्यात ठेवून ते मिश्रण नंतर सहनशक्तीच्या गॅसवर ठेवा. त्या मिश्रणाला आत्मनिश्चयाचा रंग आला की त्यात सत्यसंगाचा 1 किलो रस टाका, त्यानंतर हे मिश्रण बराच वेळ उकळा. उतरवून खाली ठेवल्यावर ते हळूहळू घट्ट होईल. त्यानंतर त्याच्या आत्मभिमानाच्या छोट¬ा-छोट¬ा गोळ्या तयार करून एकतेच्या भांड¬ात ठेवा.


 शुद्धसंकल्पाची खिचडी व विश्वासाची रोटी हर्षितमुखता व मधुरतेच्या भाजीबरोबर खाण्यापूर्वी रोज सकाळी व संध्याकाळी ज्ञानमुरलीबरोबर एक किंवा दोन गोळ्या (आजारानूसार) नियमितपणे घ्या.
पथ्य : परचिंतनाची भजी, व्यर्थ संकल्पाची भाजी, ईश्र्या-द्वेशाची मिरची व देहभिमानाचे आंबट पदार्थ कटाक्षाने टाळावेत.
– रूहानि डॉ. ब्रा.कु. अच्युत, आटपाडी.



 


 

admin

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *