Bkvarta

मराठी अनुभव

असाही एक चमत्कार


– ब्राहृाकुमार डॉ. रमेश, माऊंट आबू


माझी आई धार्मिक वत्तीची होती, लहाणपणी ती मला श्लोक शिकवित असे. दिवसातून दोन वेळा, सकाळी व संध्याकाळी मी म्णत असते.  ते शलेक वर्षानुवर्ष म्हटल्याने आजही ते माझ्या कानावर पडत असल्याचा भास होतो.  त्यामुळे माझे मन भगवद्गीतेच्या अध्ययनाकडे वळले असावे. मी आश्रमात शिकायला गेलो. भगवद्गीतेतील ठराविक श्लोक म्हटल्याशिवाय आम्हा विद्याथ्र्यांना भोजन मिळत नसे.  सकाळ-संध्याकाळ प्रार्थना म्हणणे आणि भोजनाचे वेळी गीतेतील ठराविक श्लोक म्हणणे असा आमचा परिपाठ होता. ब्रााहृामुहूर्ती प्रत्येकाने उठलेच पाहिजे, असा दंडक होता. न उठल्यास तोंडावर पाण्याचा शिपका पडत असे. काही विद्यार्थी या धसक्यानेच उठत असत. गीताध्ययनासाठी मी स्वत:हून आश्रमात गेलो असल्याने न चुकता मी पहाटे उठत असे.
 गीतेतील काही श्लोक मला फार आवडतात. कंठोपनिषदातील मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिम्    यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् ाा हा श्लोक तर मी माझ्या ह्मदयावरच कोरला आहे. जे कार्य मनुष्याच्या कुवतीबाहेरचे आहे, जेव्हा संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञमंडळी हात टेकतात आणि परमे·ाराला शरण जातात. त्यावेळी सर्वशक्तिवान शिवपरमात्मा मदतीला धाऊन जाऊन असंभव गोष्ट संभव करून दाखवितो. हे मी ब्राहृाकुमारी वि·ाविद्यालयात शिकविल्या जाणा­या राजयोगाच्या अध्ययनावरून सांगतो.
 मी अनेक ठिकाणी नोक­या केल्या. अनेक पदे भूषविली, आयुष्यात खूप माया (पैसा) जमा केला. परंतु जीवनात काही तरी विशेष करुन दाखवावे असे मला नेहमी वाटे.  दुस­या शब्दांत सांगायचे झाल्यास, असंभव गोष्ट संभव करुन दाखविण्याची जिद्द मी बाळगून होतो. परमे·ाराच्या मदतीविना हे अशक्य आहे, हेही मी जाणून होतो. म्हणून मी त्याच्या शोधात होतो.
 माझी पत्नी आणि मी शासकीय नोकरीत होतो. अनेक वर्ष सेवा केल्यानंतर 1991 मध्ये आम्ही दोघांनी आपपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यानच्या काळात आम्हला प्रजापिता ब्राहृाकुमारी ई·ारीय वि·ा विद्यालयात परमात्म्याचा सत्य परिच प्राप्त झाला आणि ब्राहृाकुमारींनी स्थापन केलेल्या ग्लोबल हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर मध्ये सेवेसाठी म्हण्ून मी 1991 मध्ये दाखल झालोत. मी हजारो रूग्णांचे आजार बरे केले. त्यातील अविस्मरणीय , अवि·ासनीय अशी ही एक केस.
 मणिनगर अहमदाबादनिवासी श्री. स्वामीनारायण गादी संस्थानाचे स्वामी पुरुषोत्मदासजी हे वास्तुशास्त्रज्ञ / अभियंता आहेत. भारतातील स्वामीनारायण गादी संस्थानच्या सर्व मंदिराचे व शिक्षण विभागाचे ते प्रमुख आहेत. दैववशात उतारवयात ते अपंग झाले. शिष्यांच्या आधाराशिवाय ते उठू शकत नव्हेत.  बसूही शकत नव्हते. चालणे  तर दूरच राहिले. 
 स्वामी पुरूषोत्तमदासजींनी गावोगावी जाऊन उपचार करून घेतले.  परंतु आराम पडला नाही.  मुंबईतील एका डॉक्टराने एके दिवशी (8.4.98) त्यांच्या पाठीच्या मणक्याचे ऑपरेशन केले. तरीही अपंगत्व कमी झाले नाही. बरे होण्याची त्यांनी अशाच सोडून दिली.


 परंतु स्वामीजींच्या पूर्वपुण्याईमुळे त्यांच्या शिष्यंनी तसेच संस्थानचे प्रमुख आचार्य स्वामी पुरुषोत्तम प्रियदासजींनी अखेरचा उपाय म्हणून माऊंट आबूमधील ब्राहृाकुमारींच्या ग्लोबल हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर मध्ये उपचार करुन घेण्याच्या आग्रह केला.  ह्रा हॉस्पिटलमध्ये अॅलोपथी, होमिओपॅथी इत्यादी विभागांबरोबर मॅग्नेटो-थेरअपी (अभिचंुबक चिकित्सा) हाही एक विभाग आहे. येथे त्यांनी उपचार करुन घेण्यास सुरुवात केली.
 पहिले तीन महिने चंुबक चिकित्सेने मी त्यांच्यावर उपचार केले. त्यांनी श्रद्धापूर्वक त्याला साथ दिली. मॅग्नेटिक पल्स बेडफोर्स व मॅग्नेटिक हिलरच्या सहाय्याने पोट व कंबरेवर उपचार केले.  नंतर पल्स मॅग्नेटिक वेल व हायपॉवर मॅग्नेट तसेच इलेक्ट्रोमॅग्नेटने गुडघे, टाचा व तळपायांवर उपयार केले. थोड¬ाच कालावधीत त्यांच्या पायात शक्ती आली.  आधाराविना ते बसू लागले.  हळूहळू उभेही राहू लागले.  पल्सरिंगच्या सहाय्याने गुडघे व तळपायांवर उपचार करीत असतांनाच मॅग्नेटिक तेलाने चंुबकीय मसाज केला. त्याचा परिणाम असा झाला की, स्वामीजी उभे राहू लागले. चुंबक चिकित्सेअंतर्गत त्यांना एस्ट्रोप्लस इलेक्ट्रो मॅग्नेट इन्डक्शन एनर्जी ट्रिटमेंट दिली. ह्रा संपूर्ण  चिकित्सेचा परिणाम असा झाला की स्वामीजी वॉकरच्या सहाय्याने चालू लागले.  पुढे वॉकरचा आधार तर सोडाच, पण त्यांची काठीही सुटी आणि कशाच्याही कोणाचही आधाराविना ते उठू-बसू लागले, चालू लागले, पाय­याही चढू-उतरू लागले.


 आपल्या निवासस्थानी पोहोचल्यावर स्वामीजींनी ग्लोबल हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरच्या सर्व डॉक्टरांचे व कर्मचा­यांचे मनापासून आभार मानले. ते आपल्या पत्रात लिहितात – जय स्वामिनारायण, लॉर्ड स्वामिनारायण, माझे अतिप्रिय आदरणीय गुरूपिता श्री मुक्तजीवन स्वामीबाप्पांच्या कृपेने तसेच ग्लोबल हॉस्पिटल व रिसर्च सेंटर (मॅग्नेटोथेरपी) चे डॉ. रमेश आणि त्यांच्या सहकार्यांनी माझ्यावर केलेल्या उपचाराने माझे स्वास्थ्य ठीक झाले.  ही सर्वशक्तिवान परमपिता परमात्म्याची कृपा म्हणावी लागेल.


 माझी ही केस आगळीवेगळी होती, तिचे निदान कोणालाही झाले नव्हते.  हा पक्षघात आहे, मांस पेशींची शिथिलता आहे, की रक्तप्रवाहांमध्ये अवरोध आहे हे कोणालाही समजले नव्हते.  ऑर्थोपेडिक सर्जन, न्यूरोफिजिशियन, न्यूरोसर्जन व अन्य अनेक विशेषज्ञांया सल्ला घेतला होता.  परंतु निदान झाले नाही, अखेरिस (दि. 3.3.98) पक्षघाताचे निदान झाले. दि. 8.4.98 रोजी मुंबईला शस्त्रक्रिया करण्यात आली, परंतु स्वास्थ्य काही सुधारले नाही.


 माझे प्रिय व आदरणीय प्रमुख आचार्य स्वामी श्री पुरूषोत्तम प्रियदासजींनी ब्राहृाकुमारींच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार करुन घेण्याचा आग्रह केला.


 मॅग्नेटोथेरपीचे डॉ. रमेश यांनी माझी शारीरिक तपासणी केली व नियमितपणे चुंबकचिकित्सेचा उपचार करुन घेण्याचा सल्ला दिला.  नोव्हेंबर 1998 मध्ये चुंबकचिकित्सेपूर्वी मी उठण्यास व चालण्यास असमर्थ होतो.  मात्र उपचारानंरत मला नवजीवन प्राप्त झाले.  प्रथम वॉकरच्या सहाय्याने मी चालण्यास सुरुवात केली. थोड¬ाच अवधीत काठीचा आधार घेऊन मी चालू लागलो.  पुढे काठीचाही आधार सुटला.  डॉ. रमेश धरमठोक यांच्या चिकित्सेमुळे तसेच त्यांच्या कार्यशैलीमुळे माझ्यातील शारीरिक शक्ती पुनर्जिवित झाली.  मानव सेवा करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याची लॉर्ड स्वामिनारायणांनी कृपा करावी त्यांच्या चरणी प्रार्थना करुन माझे पत्र पुरे करतो.


 वरील केसची माहिती ग्लोबल हॉस्पिटलचे मुख्य ट्रस्टी, मेडिकल अधिक्षक व मेडिकल डायरेक्टर यांनी सांगितली.  तेव्हा त्यांना आनंद झाला.  आनंदाच्या भरात मुख्य ट्रस्टींचा हात माझ्या पाठीवरून फिरला, तो क्षण मी कधीच विसरु शकत नाही.  तसेच स्वामिनारायण संस्थेच्या शिष्य मंडळींना व प्रमुखांना जो आनंद झाला, तो शब्दांकित करणेही कठीण आहे.


 मुकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिम्
 यत्कृपा तमहं वंदे परमानन्दमाधवम्


 शिवपरमात्मा स्थापित प्रजापिता ब्राहृाकुमारी ई·ारीय वि·ा विद्यालयात शिकविल्या जाणा­या राजयोगाच्या अभ्यासाला कृतीची बैठक दिल्याने त्या केसद्वारे वरील श्लोकाचा अर्थ मला चांगला समजला.

admin

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *